प्रासंगिक | १ मे | कल्पना देशमुख
(Women) कामगार म्हटले की संघटना ही आलीच आणि या संघटनेचे नेतृत्व करणारा ‘महान तत्त्वज्ञ, नेता होऊन गेला तो म्हणजे कार्लमार्क्स’ त्याचे विचार आजही शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र व कामगार लढा यामध्ये लोकप्रिय आहे. त्याने ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत मांडला जो मानवी इतिहास व आर्थिक संबंधांवर आधारित आहे. यात त्याने भांडवलदार व कामगार यांच्यातील संघर्षावर भाष्य केले आहे.
(Women) कार्ल मार्क्सची सर्वात लहान मुलगी एलियानोर मार्क्स ही वयाच्या सोळाव्या वर्षापासून वडिलांसोबत कामगार चळवळ, आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये सहभागी होत असे. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने क्लेमेंटिना ब्लॅक बरोबर महिला कामगारांना संघटित करण्याचे काम केले. त्या इंग्लंडच्या सर्वोत्तम वक्त्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध होत्या गोदी कामगारांच्या संपात त्या प्रामुख्याने सहभागी होत्या. एलियानोर यांनी वैज्ञानिक समाज वादावरच्या अनेक वैचारिक पुस्तकांचा व प्रसिद्ध साहित्यिक कृतींचा इंग्रजीत अनुवाद केला. पूर्वी स्त्रियांना संघटित करणे देखील कठीण असायचे. कारण आधीच त्यांना कुटुंबातील सर्व जबाबदारी पार पाडून घराबाहेर पडावे लागते. त्यात काम वेळेत होणे गरजेचे असते. त्यानंतर संघटित होणे व आपल्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन लढणे ही सर्वच दृष्टीने कठीण बाब होती. परंतु कठीण प्रसंगी कंपनीच्या मुख्य
(Women) अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणे व त्यानुसार योग्य निर्णय घेणे याचे ज्ञान देखील कामगारांना असणे आवश्यक होते. संप आणि बहिष्काराचा मार्ग कुठे व कधी अवलंबायचा, कामगार अधिकारांचे संरक्षण करणारे कायदे कसे पदरात पाडून घ्यायचे आदी. अशा परिस्थितीत स्त्रियांनी काय करायला हवे.
पुरुष कामगारांच्या स्त्री प्रतिद्वंद्वी म्हणून नव्हे तर संघर्षात त्यांच्या साथीदार म्हणून संघटित व्हायला हवे. आजच्या घडीला काम करणाऱ्या महिलांची संख्या त्या काही वर्षात लक्षणीय वाढलेली दिसून येते. या आधुनिक युगात महिला अनेक कंपन्यांमध्ये छोट्या मोठ्या पदावर सक्षम नेतृत्व करताना दिसतात. त्यांच्यातील क्षमता, नीट नेटके नियोजन, कामाची सुसूत्रता, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आदी बाबी लक्षवेधी ठरतात.
महिला आणि नेतृत्वावरील प्यू रिसर्च सेंटरच्या नवीन सर्वेक्षणानुसार बहुतांशी अमेरिकन लोकांना बुद्धिमत्ता आणि नवोपक्रमाची क्षमता यासारखे नेतृत्व गुण ज्या महिलांमध्ये अधिक आहे त्या पुरुषांपेक्षा वेगळ्या वाटतात. बघायला गेलो तर जगात महिलांना दैनंदिन कामाचा अनुभव अधिक असतो. अगदी भाजी विकत घेण्यापासून ते मॉलमधील उच्चतम खरेदी विक्रीपर्यंत तसेच उत्तम मार्केटिंगचे कौशल्य आदी गुण वाखाणण्याजोगे असते. अशाप्रकारे त्यांना वेगवेगळ्या कामाचा वातावरणाचा अनुभव असल्याने त्या अधिक सक्षम व्हायला शिकतात. कमीत कमी साधने वापरत अधिक उत्पादन करून कंपनीला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी महिलांना अधिक कुशलतेने काम काम करावे लागते. परंतु हे कौशल्य टिकवण्यासाठी महिलांसमोर अनेक आव्हाने देखील आहेत. कार्पोरेट जगात कंपन्यांमध्ये व व्यवसायात देखील प्रचंड स्पर्धा आहे. आपली उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे. त्याची किंमत टिकाऊपणा साऱ्याच बाबी महत्त्वपूर्ण ठरतात अशी अनेक आव्हाने आहेत.
महिलांना आजही त्यांच्या क्षेत्रात लिंगभेद अन्याय, वागणूक किंवा असमान कामाचे क्षेत्र मिळणे. कमी अधिक प्रमाणात या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागते. नेतृत्वाच्या संधी मिळण्यासाठी महिलांना अधिक कठोर परिश्रम करावे लागतात. या सर्व अडचणींवर मात करून महिलांनी उच्चपदापर्यंत पोहोचणे ही एक झुंज आहे.
आजपर्यंत याविषयी अनेक संशोधने, चर्चासत्रे झाली तसेच पुस्तकाद्वारे अनेक लेख प्रकाशित झाले आहे. त्यामधील एक उदाहरण द्यायचे झाले तर ‘मिळून साऱ्याजणी’ हे पुस्तक आहे यामध्येे महिला कामगार समस्या, त्यांच्या पुढील आव्हाने आयुष्याची झुंज आदी अनेक बाबींचा उहापोह विस्तृत सांगितला आहे. महिलांना आता नवी दिशा नवी गती व नवी ऊर्जा मिळण्याची गरज आहे. तरच महिला कामगार सक्षमपणे नेतृत्व करू शकतात.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.