हिंगोली | १५ एप्रिल | भाऊराव बेंडे
(latest news) गुंज येथील दलित मजूर असलेल्या ७ महिलांचा ट्रॅक्टरने विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेला १२ दिवस होऊन गेले तरी सरकारने जाहिर केलेले प्रत्येकी ७ लाख रुपये अजून जमा झाले नाही. यासह विविध मागण्यांसाठी माकप मराठवाड्याचे नेते कॉ.विजय गाभने यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
(latest news) यावेळी तहसीलदार यांनी समोर येऊन निवेदन घेतले. मदतीचा प्रस्ताव पाठवल्याचे सांगून स्थानिक मागण्यांमध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. लहुजी साळवे नगर, गुंज येथील नागरिकांना पक्की घरे बांधून देण्यात यावी. सर्व घरी लाईट मीटर व पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात यावे. पिडितांच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी व पाच एकर ओलिताची जमीन देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

(latest news) यावेळी माकपचे कॉ.विजय गाभने, कॉ.चपंत नाईक, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.सुरेश काचगुंडे, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.लता गायकवाड, कॉ.नसीर शेख, भंडारे सर , कॉ.श्याम सरोदे, कॉ.जय गायकवाड यांच्यासह गुंज गावच्या नागरिक उपस्थित होते. आंदोलनास वंचित बहुजन आघाडी, मानवी हक्क अभियान तसेच इतर पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.