Education | विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासास मिळाले नवे बळ; 20 विद्यार्थ्यांना सायकली व 14 पंख्यांचे वितरण
We Club of Vashi Navi Mumbai आणि मैत्री फाउंडेशनचा पुढाकार
सत्यमेव जयते
- सकस शिक्षणमार्ग
(Education) शिक्षणासाठी दररोज लांब पल्ला पार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी We Club of Vashi Navi Mumbai आणि मैत्री फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुका वावरले न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत २० सायकली, १२ छताचे पंखे व २ टेबल फॅन भेट दिले.
(Education) या उपक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे विभागीय अधिकारी कोंगेरे मोहन केशव तसेच सामाजिक कार्यकर्ते जगे काका यांचे विशेष सहकार्य लाभले. जगे काका यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना मोफत व उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे असंख्य विद्यार्थी आज मोठमोठ्या कोर्सेससाठी प्रवेश घेऊ शकले. जगे काका हे नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्या कार्यात अनेक शिक्षकवृंद सातत्याने सहकार्य करत आहे.
Leave a comment


