अहमदनगर | २९ मार्च | प्रतिनिधी
(Accident) औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय ते बीटीआर समोरील गतिरोधक या दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने एकापाठोपाठ अनेक वाहने धडकली. सुमारे पाच ते सहा गाड्यांचे नुकसान झाले आहे.
(Accident) आज सकाळी साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडलेली असून सुदैवाने घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. बीटीआरच्यासमोर असलेला गतिरोधक काढण्याची नागरिकांकडून यानंतर मागणी करण्यात आली. प्रचंड मोठ्या प्रमाणात उंचवटे असल्याने हा गतिरोधक धोक्याचा ठरत आहे.