अहमदनगर | १० फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Education) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वित्त व लेखा विभाग व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात विद्यापीठाची परीक्षा विषयक देयके ऑनलाईन भरण्याची प्रशिक्षण कार्यशाळा दि. १० मार्च, २०२५ रोजी संपन्न झाली.
(Education) कार्यशाळेस व्यवस्थापन परीषद सदस्य प्रा. संदिप पालवे, संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, अधिसभा सदस्य डॉ. प्रदिप दिघे, महाविद्यालयाचे प्राचार्य व अधिसभा सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे, वित्त व लेखा विभागाचे सहायक कुलसचिव डॉ. मयुर चोरडीया, अहिल्यानगर उपकेंद्राचे सहायक कुलसचिव डॉ. शिवप्रसाद घालमे विद्यापीठातील वित्त व लेखा विभागातील कर्मचारी तसेच अहमदनगर जिल्हयातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व परीक्षा अधिकारी उपस्थित होते.
(Education) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा आयोजन खर्चाची देयके ऑनलाईन पदधतीने सादर करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीय कार्यप्रणालीचा वापर कसा करावा, याचे सादरीकरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी या नवीन कार्यप्रणालीचा वापर महाविद्यालयांनी केल्याने वेळेची बचत होणार असल्याचे सांगितले. व्यवस्थापन परीषद सदस्य प्रा. संदिप पालवे यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले की, ही नविन ऑनलाईन संगणकीय कार्यप्रणाली सुरु करण्यासाठी विद्यापीठात अनेक बैठका घेण्यात आल्या. आता ही नवीन कार्यप्रणाली सुरु झाल्याने महाविद्यालयातील जो कर्मचारी परीक्षेशी संबंधीत कामकाज करणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये त्याच्या कामाचे मानधन विद्यापीठातर्फे वर्ग करण्यात येणार आहे. अधिसभा सदस्य डॉ. प्रदिप दिघे यांनी अहमदनगर जिल्हयातील महाविद्यालयातील उपस्थित सर्व परीक्षा अधिकारी व कर्मचारी यांना या कार्यप्रणालीनूसार काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात न्यू आर्टस संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी वित्त विभागाच्या या नवीन कार्यप्रणालीमुळे विहीत वेळेत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यांचे परीक्षा विषयक मानधन मिळेल याबाबत विश्वास व्यक्त केला.