मुंबई | १० मार्च | गुरुदत्त वाकदेकर
(Sports) भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम कामगिरीने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवत २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व प्रस्थापित करत गेल्या ८ महिन्यांत दुसरे मोठे आयसीसी विजेतेपद पटकावले आहे.
(Sports) सामन्याच्या ठळक घडामोडी
न्यूझीलंड: २५१/७ (५०)
भारत: २५४/६ (४९)
भारत ४ गडी राखून विजयी
रोहित शर्मा (७६) आणि शुभमन गिल (३१) यांनी दमदार सलामी दिली, १७ व्या षटकात १०० धावांची भागीदारी पूर्ण.
श्रेयर अय्यर (४८) आणि अक्षर पटेल (२९) यांनी मधल्या फळीत संघाला सावरले.
के. एल. राहुल (३४) आणि रवींद्र जडेजा (१२) यांनी संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेल (५०), डॅरिल मिचेल (६३) आणि ग्लेन फिलिप्स (३४) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी २ बळी घेत न्यूझीलंडला २५१ धावांवर रोखले.
रोहित शर्माने ४१ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत आक्रमक सुरुवात दिली.
कर्णधार रोहित शर्माने ८३ चेंडूत ७६ धावांची जबरदस्त खेळी केली.
श्रेयर अय्यर अर्धशतकापासून अवघ्या २ धावांनी मुकला.
के. एल. राहुल आणि रवींद्र जडेजाने शेवटपर्यंत धीरगंभीर फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला.
रवींद्र जडेजाने विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.