(Social) तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील आढाववस्ती येथे १३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच दिवंगत लताबाई नानाभाऊ कराळे यांची दुपारच्या वेळी अमानुष हत्या झाली. घटना घडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक माणिक चौधरी, स्थानिक गुन्हा अन्वेषण यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की, दोन दिवसात या हत्येचा तपास लावला जाईल. परंतु ही घटना घडून वीस दिवस झाले आहेत. परंतु हत्येच्या तपासात काहीही प्रगती झालेली नाही. या हत्येमुळे पिंपळगाव माळवी परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. दुपारच्या वेळी महिला शेतात काम करण्यासाठी धजावत नाही.
(Social) स्थानिक संतप्त ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला हत्येचा तपास आठ दिवसात झाला नाही तर, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी पिंपळगाव माळवीचे उपसरपंच मच्छिंद्र झिने, मेजर विश्वनाथ गुंड, माजी सरपंच रघुनाथ झिने, सामाजिक कार्यकर्ते गोरख आढाव, माजी सरपंच संतोष झिने, मांजरसुंबा माजी सरपंच जालिंदर कदम, पोलीस पाटील आदिनाथ मते, जालिंदर कराळे, नानाभाऊ कराळे, धोंडीभाऊ कराळेंसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.