पारनेर | १ फेब्रुवारी | मोहसिन शेख
(biodiversity) तालुक्यातील वारणवाडी फाटा येथील माळवाडी परिसरातील बाबासाहेब काशिनाथ पवार वस्तीवर काल पहाटे अंदाजे सव्वा ४ वाजेच्या सुमारास बिबटने पाळीव कुत्र्यावर हल्ला चढविला. कुत्र्याच्या आवाजाने बाबासाहेब पवार बाहेर डोकावले असता त्यांना बिबटचे दर्शन झाले. दरवाजाच्या पत्र्याचा मोठ्याने आवाज केल्याने बिबटने धूम ठोकली. त्यांनी सिसिटीव्हीमधे पाहिले असता बिबटचे चित्रांकन झाले होते.
देसवडे, पोखरी परिसरात अनेकदा बिबट दिसत असतो. माळवाडी परिसरातील वस्त्यांवरील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बाबासाहेब पवारांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हे ही वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर