india news | …जर वेळीच उपाययोजना केली नाही तर, लोक उपासमारीने अन्न पाण्यावाचुन मरू शकतात – डॉ. सुनील गंधे; प्रयागराजमध्ये अडकले अहिल्यानगरमधील भाविक

उपसंपादक | दिपक शिरसाठ

प्रयागराज, कुंभमेळा | ३० जानेवारी | प्रतिनिधी

(india news) येथील जिल्हाभरातील अनेक भाविक प्रयागराज कुंभमेळा रस्त्यावर अडकले आहेत. गेले १२ / १३ तास अन्नपाण्याविणा त्यांची तडफड सुरू असून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी तेथील स्थानिक प्रशासनासोबत संपर्क करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे़. रयत समाचार प्रतिनिधी यांना प्रयागराज येथे गेलेले जखणगावचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी संपर्क साधून ही माहिती दिली तसेच तेथील गंभीर परिस्थितीचे व्हिडीओ व फोटो पाठविले.india news

(india news) तेथील परिस्थितीची माहिती देताना गंधे म्हणाले, जवळपास पाच किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी अन्नाची व्यवस्था नाही. लाखो भाविकांची उपासमार सुरू असून यांना मदतीची विशेषता अन्नपाण्याची नितांत गरज आहे. कदाचित दोन दिवस एकाच ठिकाणी अडकून पडण्याची भाविकांवर वेळ येवू शकते. मौनी अमावस्येच्या पर्वावर दहा कोटी लोकांनी शाहीस्नानाचा आनंद घेतला परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यास उत्तरप्रदेश प्रशासनाकडून योग्य ती तयारी केल्याचे दिसून आले नाही. साध्या पार्किंग व्यवस्थेमध्येसुद्धा अस्ताव्यस्तपणा व अनियमितता दिसून आली. परिणामी रात्री बारा वाजल्यापासून आतापर्यंत आपणाला पाठवलेल्या आमच्या करंट लोकेशनवर आमची गाडी उभी आहे. दुर्दैवाने या परिसरात कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा छोटी टपरी किंवा साधी पाण्याची व्यवस्था नाही. सुमारे एक लाखापेक्षा जास्त पब्लिक या लोकेशनवर ट्रॅफिक जाममध्ये आपल्या गाडीत बसून आहे.

(india news) ते पुढे म्हणाले, कोणी सहकार्य करण्यापेक्षा संधीचे सोने करून पाण्याची बाटली पन्नास रुपयाला व छोटे-छोट्या गोष्टी भाविकांची लूट करत आहेत. माझी आपल्या मार्फत प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे, किमान या सर्व पार्किंगमध्ये अडकलेले जे भाविक आहेत यांच्या जेवणाची आणि किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ही बाब गंभीर असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तरी आपण पत्रकार या नात्याने हा विषय संबंधितांपर्यंत त्वरित पोचवावा. आमचे लोकेशन टाकलेले आहे. संपूर्ण उत्तरप्रदेशमधे सर्वत्र टोलनाके सुरू असून अहिल्यानगर ते प्रयागपर्यंत एका लक्झरी बसचे ११ हजार रूपये एका बाजूच्या प्रवासाचा टोल भरला.

वाहतूक कोंडीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्या ठिकाणी गाड्यांचे पार्किंग केले तेथे कोणीही स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस किंवा कुठलीही यंत्रणा कार्यरत नव्हती. नवीन बायपासचे काम ‘चालू’ असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या ढिगार्‍यावर सपाट करून चार-चार, पाच-पाच किलोमीटरच्या रांगेत गाड्या उभ्या करण्यात आल्या. ज्यावेळेस गाडी येऊन उभे राहायची त्याला नंतर काय करायचे याच्या सूचना कोणी दिल्या नाही. त्यामुळे हजारो गाड्यांची लाईन एका नवीन काम चालू असलेल्या हायवेवर अशा ५०/५० रांगा होत्या. ज्यावेळी भाविक कुंभमेळा शाही स्नान करून परत आले, त्यांच्या गाडीत बसले तेव्हा ड्रायव्हरने मूळ समस्येचा उलगडा केला. इथे कोणी प्रशासक आला नाही, तेव्हा आमच्या गाडीला हलवण्यासाठी काही संधी मिळाली नाही. तिथून पुढे प्रत्येकाचे ड्रायव्हर येईपर्यंत जाम तसेच होते. माझी गाडी आधी की तुझी गाडी आधी या गोंधळात गाड्यांचे अजून ट्रॅफिकजाम झाले. भक्तांचेसुध्दा गाडी काढण्यावरून भांडण झाले की तुमची गाडी काढायची आमची गाडी काढायची. काही ठिकाणी काचा फुटल्या. काही ठिकाणी एकमेकाला धक्के लागले. याची जाणीव प्रशासनाला करून दिली परंतु गर्दी आणि प्रशासकीय यंत्रणेचा ताण या गोष्टींमध्ये असणारा असा काही निर्णय करण्यात आल्याच आम्हाला समजले नाही. मग आम्ही आमच्याच गाडीतील चाळीस-पन्नास स्वयंसेवक त्यामध्ये आरोग्यग्राम जखणगावचे २५, आदर्शगाव हिवरेबाजारचे ७/८ स्वयंसेवक त्याचप्रमाणे हिंगणगाव, हमीदपुर, टाकळी, अकोले, अहिल्यानगरमधील सुमारे ५० स्वयंसेवकांनी स्वतः झाडाच्या काठ्या काढून आणल्या व संघटना स्थापन केली. ट्रॅफिक कंट्रोलरचे काम केले. ज्यामुळे हजारो गाड्या त्या परिसरातून ट्रॅफिक जाममधून बाहेर काढण्यात यश आले. पुढे अशा दोन हजार गाड्या निघाल्यानंतर आम्ही पुढील व्यवस्था उरलेल्या गाड्यांच्या भक्तांकडे देऊन रात्री आठच्या सुमारास तिथून निघालो.

डॉ. सुनील गंधे यांनी अत्यंत गंभीरपणे सांगितले की, जर वेळीच उपाययोजना केली नाही तर, लोक उपासमारीने अन्नपाण्यावाचुन मरू शकतात.

आरोग्यग्राम जखणगांव येथील स्वयंसेवकांनी ट्रॅफिकजाममध्ये अडकलेल्या भाविकांना गाडीतच आरोग्यसेवा पुरवली. अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले. एकाच जागेवर २४ तास मोकळे घालविण्यापेक्षा मोफत आरोग्यसेवा पुरवून वेळ व संधीचा सदुपयोग केला.

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

Contents
प्रयागराज, कुंभमेळा | ३० जानेवारी | प्रतिनिधी(india news) येथील जिल्हाभरातील अनेक भाविक प्रयागराज कुंभमेळा रस्त्यावर अडकले आहेत. गेले १२ / १३ तास अन्नपाण्याविणा त्यांची तडफड सुरू असून जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी तेथील स्थानिक प्रशासनासोबत संपर्क करून दिलासा द्यावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे़. रयत समाचार प्रतिनिधी यांना प्रयागराज येथे गेलेले जखणगावचे सरपंच डॉ. सुनिल गंधे यांनी संपर्क साधून ही माहिती दिली तसेच तेथील गंभीर परिस्थितीचे व्हिडीओ व फोटो पाठविले.(india news) तेथील परिस्थितीची माहिती देताना गंधे म्हणाले, जवळपास पाच किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी अन्नाची व्यवस्था नाही. लाखो भाविकांची उपासमार सुरू असून यांना मदतीची विशेषता अन्नपाण्याची नितांत गरज आहे. कदाचित दोन दिवस एकाच ठिकाणी अडकून पडण्याची भाविकांवर वेळ येवू शकते. मौनी अमावस्येच्या पर्वावर दहा कोटी लोकांनी शाहीस्नानाचा आनंद घेतला परंतु एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यास उत्तरप्रदेश प्रशासनाकडून योग्य ती तयारी केल्याचे दिसून आले नाही. साध्या पार्किंग व्यवस्थेमध्येसुद्धा अस्ताव्यस्तपणा व अनियमितता दिसून आली. परिणामी रात्री बारा वाजल्यापासून आतापर्यंत आपणाला पाठवलेल्या आमच्या करंट लोकेशनवर आमची गाडी उभी आहे. दुर्दैवाने या परिसरात कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा छोटी टपरी किंवा साधी पाण्याची व्यवस्था नाही. सुमारे एक लाखापेक्षा जास्त पब्लिक या लोकेशनवर ट्रॅफिक जाममध्ये आपल्या गाडीत बसून आहे.(india news) ते पुढे म्हणाले, कोणी सहकार्य करण्यापेक्षा संधीचे सोने करून पाण्याची बाटली पन्नास रुपयाला व छोटे-छोट्या गोष्टी भाविकांची लूट करत आहेत. माझी आपल्या मार्फत प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे, किमान या सर्व पार्किंगमध्ये अडकलेले जे भाविक आहेत यांच्या जेवणाची आणि किमान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ही बाब गंभीर असून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. तरी आपण पत्रकार या नात्याने हा विषय संबंधितांपर्यंत त्वरित पोचवावा. आमचे लोकेशन टाकलेले आहे. संपूर्ण उत्तरप्रदेशमधे सर्वत्र टोलनाके सुरू असून अहिल्यानगर ते प्रयागपर्यंत एका लक्झरी बसचे ११ हजार रूपये एका बाजूच्या प्रवासाचा टोल भरला.वाहतूक कोंडीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. ज्या ठिकाणी गाड्यांचे पार्किंग केले तेथे कोणीही स्वयंसेवक, होमगार्ड, पोलीस किंवा कुठलीही यंत्रणा कार्यरत नव्हती. नवीन बायपासचे काम ‘चालू’ असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या ढिगार्‍यावर सपाट करून चार-चार, पाच-पाच किलोमीटरच्या रांगेत गाड्या उभ्या करण्यात आल्या. ज्यावेळेस गाडी येऊन उभे राहायची त्याला नंतर काय करायचे याच्या सूचना कोणी दिल्या नाही. त्यामुळे हजारो गाड्यांची लाईन एका नवीन काम चालू असलेल्या हायवेवर अशा ५०/५० रांगा होत्या. ज्यावेळी भाविक कुंभमेळा शाही स्नान करून परत आले, त्यांच्या गाडीत बसले तेव्हा ड्रायव्हरने मूळ समस्येचा उलगडा केला. इथे कोणी प्रशासक आला नाही, तेव्हा आमच्या गाडीला हलवण्यासाठी काही संधी मिळाली नाही. तिथून पुढे प्रत्येकाचे ड्रायव्हर येईपर्यंत जाम तसेच होते. माझी गाडी आधी की तुझी गाडी आधी या गोंधळात गाड्यांचे अजून ट्रॅफिकजाम झाले. भक्तांचेसुध्दा गाडी काढण्यावरून भांडण झाले की तुमची गाडी काढायची आमची गाडी काढायची. काही ठिकाणी काचा फुटल्या. काही ठिकाणी एकमेकाला धक्के लागले. याची जाणीव प्रशासनाला करून दिली परंतु गर्दी आणि प्रशासकीय यंत्रणेचा ताण या गोष्टींमध्ये असणारा असा काही निर्णय करण्यात आल्याच आम्हाला समजले नाही. मग आम्ही आमच्याच गाडीतील चाळीस-पन्नास स्वयंसेवक त्यामध्ये आरोग्यग्राम जखणगावचे २५, आदर्शगाव हिवरेबाजारचे ७/८ स्वयंसेवक त्याचप्रमाणे हिंगणगाव, हमीदपुर, टाकळी, अकोले, अहिल्यानगरमधील सुमारे ५० स्वयंसेवकांनी स्वतः झाडाच्या काठ्या काढून आणल्या व संघटना स्थापन केली. ट्रॅफिक कंट्रोलरचे काम केले. ज्यामुळे हजारो गाड्या त्या परिसरातून ट्रॅफिक जाममधून बाहेर काढण्यात यश आले. पुढे अशा दोन हजार गाड्या निघाल्यानंतर आम्ही पुढील व्यवस्था उरलेल्या गाड्यांच्या भक्तांकडे देऊन रात्री आठच्या सुमारास तिथून निघालो.आरोग्यग्राम जखणगांव येथील स्वयंसेवकांनी ट्रॅफिकजाममध्ये अडकलेल्या भाविकांना गाडीतच आरोग्यसेवा पुरवली. अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले. एकाच जागेवर २४ तास मोकळे घालविण्यापेक्षा मोफत आरोग्यसेवा पुरवून वेळ व संधीचा सदुपयोग केला.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
1 Comment
  • खूप चुकीचा प्रकार आहे लोक परत देवदर्शना सुद्धा जायचे नाही 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading