अहमदनगर | २८ जानेवारी | प्रतिनिधी
(politics) शिक्षक भारती या पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पुणे विभागीय कार्याध्यक्षपदी अकोले येथील अगस्ती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. महेश पाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. अहिल्यानगर, सोलापूर व पुणे जिल्ह्याचा यात समावेश होतो. अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम व संघटना बांधणीचे काम अतिशय तळमळीने पाडेकर यांनी केले. त्यांना संघटनेचे संस्थापक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, कार्यवाहक संजय वेतुरेकर, विनाअनुदान विरोधी समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड, विनाअनुदान विरोधी समितीचे महिला राज्याध्यक्ष रूपालीताई कुरुमकर व राज्य कार्यकारिणीच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
(politics) अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी राष्ट्रीयकृत बँकेत पगार होण्यासाठी व दरमहा एक तारखेला पगार होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आदिवासी दुर्गम भागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी मिळण्यासाठीसुद्धा विशेष काम पाडेकर यांनी केले. विभाग स्तरावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भारती संघटना बांधणीसाठी, शिक्षक भारतीचा प्रचार करण्यासाठी, शिक्षण, समता, प्रतिष्ठा, संधी, सत्ता प्रत्येकाच्या वाट्याला यावी, यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतावादी, आणि विज्ञानाभिमुख समाजरचनेसाठी आपण कटिबद्ध आहात, असे नियुक्तीपत्रात म्हटले.
नियुक्तीबद्दल राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष रामराव काळे, रूपाली बोरुडे, बाबासाहेब तांबे, संजय तमनर, सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संपत वाळके, गणपत धुमाळ, मफीज इनामदार, श्याम जगताप, सोलापूर जिल्हाध्यक्ष शाहू बाबर, सुजित काटमोरे, पुणे विभागीय समन्वयक पोपटराव सांबरे, जिल्हाध्यक्ष अशोक बोबडे, विजय पांडे, प्रवीण मालुंजकर, दादासाहेब कदम, सचिन जासूद, सचिन लगड, बाबाजी लाळगे, साई थोरात, संजय पवार, संजय भुसारी, किसन सोनवणे, संतोष शेंदुरकर, कैलास जाधव, संभाजी पवार, विजय कराळे, अमोल वर्पे आदी पदाधिकारी, सदस्य यांनी पाडेकर यांचे अभिनंदन केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.