Education: डॉ. पाअुलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये 1 ल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत - Rayat Samachar

education: डॉ. पाअुलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये 1 ल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

rayatsamachar
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

अहमदनगर | २६ जानेवारी | विजय मते

(education) येथील वसंत टेकडी जवळील डॉ.ना.ज.पाअुलबुधे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून स्वागत करण्यात आले. यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता.

(education) स्वागत समारंभास सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रामभाऊ बुचकुल, सचिव रामकिसन देशमुख, खजिनदार दादासाहेब भोईटे, प्रशासक अधिकारी डॉ.श्रद्धा पाअुलबुधे, बीएडच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, बी फार्मसीचे प्राचार्य डॉ.श्याम पंगा, डी.फार्मसी प्राचार्या अनुराधा चव्हाण, डॉ.वेणु कोला, माध्यमिकचे प्राचार्य माध्यमिकचे प्राचार्य भरत बिडवे प्राथमिकच्या मुख्याध्यापिकाअनिता सिद्दम, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

education
याप्रसंगी संस्थेचे दादासाहेब भोईटे, प्राचार्या डॉ.रेखा राणी खुराणा, अनुराधा चव्हाण, डॉ. श्याम पंगा, डॉ. वेणु कोला, भरत बिडवे, अनिता सिद्दम आदी उपस्थित होते.

प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत करताना मिस् फ्रेशर्स आणि मिस्टर फ्रेशर्स निवडण्यात आले. यामध्ये मिस फ्रेशर्स ऐश्वर्या पठारे तर मिस्टर फ्रेशर्स प्रमोद बाचकर डी फार्मसीमध्ये फ्रेशर्स बुशीरा इनामदार तर मिस्टर फ्रेशर्स प्रणव माने यांची निवड करण्यात आली. स्टुडेंट कॉन्सिल घेण्यात आली. यामध्ये ईशान चिंतामणी अध्यक्ष तर आदिती पवार हिची जनरल सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. स्वागत समारंभ कार्यक्रम सांगता सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन करण्यात आली.

हे हि वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी

- Advertisement -


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading