mumbai news: एसटी महामंडळाच्या 1360 हेक्टर जमिनीचा ‘विकास’ करण्यासाठी क्रेडाईने (CREDAI) योगदान द्यावे; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ‘सोयीनुसार’ ‘व्यावसायिक क्षेत्र’ विकसित करण्याची ‘ऑफर’ ?

एसटी महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर जमीन उपलब्ध

उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | २० जानेवारी | प्रतिनिधी

(mumbai news) एसटी महामंडळाच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रेडाई (CREDAI) या संस्थेने आपले योगदान द्यावे, असे ‘आवाहन’ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज’द्वारे आयोजित प्रदर्शनाला दिलेल्या भेटी दरम्यान केले.

mumbai news

(mumbai news) एसटी महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. या जागांचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ अथवा खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बसस्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेण्यात यावीत, असे सरनाईक म्हणाले.

 

 त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान १०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनलसारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारणे अपेक्षित आहे. या बदल्यात संबंधित विकासकाला त्या जमिनीवर त्यांच्या ‘सोयीनुसार’ ‘व्यावसायिक क्षेत्र’ विकसित करता येईल, अशी आवाहनवजा ‘ऑफर’ प्रताप सरनाईक यांनी दिली असल्याचा कळते.

हे ही वाचा : Social: आपला आपुलकीचा थांबा : अक्षर मानव हॉटेल आणि होम स्टे

 

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *