अहमदनगर | १५ जानेवारी | प्रतिनिधी
(india news) अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील लाडक्या बहिणांची पाणीपट्टी वाढवू नये तसेच लोकांचा रोष वाढवून घेऊ नये, यासाठी मुळ शिवसेना असलेल्या उध्दव ठाकरे सेनेच्यावतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे युवासेनेचे आनंद राठोड आणि माथाडी संघटनेचे गौरव ढोणे यांनी मागणी केली.
(india news) अधिक माहिती देताना राठोड, ढोणे यांनी सांगितले की, सध्याच्या काळात प्रचंड महागाई वाढलेली असतांना प्रस्तावित पाणीपट्टी वाढविल्यास लोकांचे आर्थिक बजेट कोलमडून जाईल. शहरात दररोज पाणी सुटत नाही. सर्वांना मुबलक पाणी मिळत नाही. महापालिकेने विजेचा खर्च कमी करण्यासाठी कार्यालयांमधील लाईटची उधळपट्टी थांबवावी, सरकारी सोलर योजना राबवावी आणि विजेचा खर्च शुन्य करावा. पाणीपट्टी वाढवून लोकांचा रोष ओढावून घेवू नये.
ते पुढे म्हणाले, सरकार महिलांसाठी विविध योजना राबवित आहेत. अशा स्थितीत शहरात पाणीपट्टी वाढ म्हणजे महिलांना व सर्व नागरिकांना त्रासदायक ठरणार आहे. याचा गंभीरतेने विचार करावा. व नगरवासियांवर कुठलीही आर्थिक वाढ करुन सर्वसामान्य जनतेवर अन्याय करु नये. अन्यथा शिवसेनेच्या वतीने लाडक्या बहिणींवर पाणीपट्टी वाढीच्या अन्यायाविरोधात जनांदोलन उभे करण्यात येईल.
हे ही वाचा : कॉम्रेड शहीद भगतसिंह स्मारकाची एल अँड टी आणि महानगरपालिकेने केली दूर्दशा #live #l&t #amc