biodiversity: 37 व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाध्यक्षपदी डॉ.अनिल माळी; 1 व 2 फेब्रुवारीला शेवगाव न्यू आर्ट्स कॉलेजमधे आयोजन - Rayat Samachar
Ad image

biodiversity: 37 व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाध्यक्षपदी डॉ.अनिल माळी; 1 व 2 फेब्रुवारीला शेवगाव न्यू आर्ट्स कॉलेजमधे आयोजन

संघटनाध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांची माहिती

उपसंपादक | दिपक शिरसाठ

संघटन आणि पक्षिमित्रांचे संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य

अमरावती | १५ जानेवारी | प्रतिनिधी

(biodiversity) या वर्षीचे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील शेवगांव येथे होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून नाशिक येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, संशोधक डॉ. अनिल माळी यांची निवड करण्यात आली. पक्षिमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात.

(biodiversity) अशा प्रकारचे संघटन आणि पक्षिमित्रांचे संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून संपूर्ण राज्यात आजवर ३६ राज्यस्तरीय संमेलने व विभाग स्तरावरील ३० संमेलनांचे आयोजन आजवर करण्यात आले आहे. या वर्षीचे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील शेवगांव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज यांचे यजमानपदाखाली शेवगांव येथे होणार आहे. शेवगांव येथील या महाविद्यालयाच्या प्रांगणात ता.०१ आणि ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत आहे. या संमेलनाच्या पूर्वी स्थानिक स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजनसुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले. संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरून किमान २५० प्रतिनिधी उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

नाव नोंदणीसाठी वेबसाईट : महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना , महाराष्ट्र

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल माळी हे पक्षी संवर्धन, जनजागृती यासाठी कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्र पक्षिमित्रच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘पक्षी अभ्यासक्रमाची’ निर्मिती सुद्धा केली आहे. त्यांनी तयार केलेला हा अभ्यासक्रम आज अनेक शाळांमधून शिकविला जात आहे. ते महाराष्ट्र पक्षिमित्रचे ज्येष्ठ सभासद असून अनेक संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.biodiversity

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
महाराष्ट्र पक्षिमित्र राज्य कार्यकारिणी तर्फे डॉ. अनिल माळी यांची एकमताने निवड करण्यात आल्याची महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.

हे ही वाचा : Social: आपला आपुलकीचा थांबा : अक्षर मानव हॉटेल आणि होम स्टे

Share This Article
1 Comment