mumbai news: सेंट जोसेफ महाविद्यालयात 11 रोजी Enterpreneural Talk Show उद्योजकता प्रशिक्षण संपन्न - Rayat Samachar
Ad image

mumbai news: सेंट जोसेफ महाविद्यालयात 11 रोजी Enterpreneural Talk Show उद्योजकता प्रशिक्षण संपन्न

प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी केले मार्गदर्शन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू, तितका नफा जास्त कमावितो – प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा

मुंबई | १३ जानेवारी | गुरुदत्त वाकदेकर

(mumbai news) शनिवारी ता. ११ रोजी ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) यांच्या सेल्फ फायनान्स विभागाच्या वतीने ‘उद्योजकता प्रशिक्षण अर्थात Enterpreneural Talk Show’ चे आयोजन करण्यात आले होते. वसई विरारमधील प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड डिमोंटि आणि जॉय डायस यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

   (mumbai news) प्रसिद्ध उद्योजक विल्फ्रेड म्हणाले, कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसायामध्ये संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाची नितांत गरज असते.

हे ही पहा : छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांचे श्रध्दास्थान शाह शरीफ दर्गा

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
यावेळी प्रसिद्ध उद्योजक जॉय डायस म्हणाले, व्यवसायातील उज्वल यशासाठी आणि भवितव्यासाठी तुमचा जनसंपर्क दांडगा असायला हवा. प्रत्येक ग्राहकाला भगवान मानता यायला हवे. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता आल्मेडा यांनी सांगितले, उद्योगात आपण जितका जास्त धोका पत्करू तितका नफा जास्त कमावितो.
  प्रास्ताविक आणि उद्योजकांचे स्वागत सेल्फ फायनान्स कॉर्डिनेटर डॉ. दीपा लोपीस यांनी, सूत्रसंचालन सबिना कोरीया आणि आभार प्रदर्शन अलिशा तुस्कानो यांनी केले. आई क्यू एसी कॉर्डिनेटर डॉ. विन्सेंट डिमेलो, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेल्फ फायनान्स विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
Share This Article
Leave a comment