श्रीरामपूर | १३ जानेवारी | प्रतिनिधी
(press) लोकहक्क फाउंडेशन श्रीरामपूरच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ज्येष्ठ पत्रकार स्व.अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार दै. लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांना जाहीर झाला असल्याची माहिती लोकहक्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार लहू कानडे व समन्वयक माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे यांनी दिली.
(press) लोकहक्क फाउंडेशनच्यावतीने गेल्या दोन वर्षांपासून स्व. अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी दै.लोकसत्ताचे वरिष्ठ उपसंपादक मोहिनीराज लहाडे व दुसऱ्या वर्षी दै. सार्वमतचे वृत्तसंपादक अशोक गाडेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यंदा लंके यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
(press) गुरुवारी, ता. १६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता माजी आमदार कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार कार्यगौरव समारंभ सन २०२५ प्रसंगी लंके यांना माजी आमदार लहू कानडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार. यावेळी सुधीर लंके हे ‘शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचार आणि आजचे महाराष्ट्रातील राजकारण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार कानडे व अशोक कानडे तसेच श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
हे हि वाचा :History: The Indians: A Useful Reference Book for Scholars of South Asian History
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.