नगर तालुका | ९ जानेवारी | प्रतिनिधी
(latest news) तालुक्यातील डोंगरगण येथील श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठाण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शुक्रवारी ता. १० रोजी सायंकाळी ५ वाजता बक्षिस वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रा. यशवंत काशिनाथ भुतकर व मुख्याध्यापिका श्रीमती बेबी चोभे यांनी दिली.
(latest news) अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, बक्षिस वितरण जिल्हा परिषद लेखाधिकारी रमेश कासार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तर स्नेहसंमेलन प्रमुख पाहुणे स्वामी ट्रॅव्हर्ल्सचे विकास सांगळे, श्री.रा.ग्रा.वि.वि. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कदम, सचिव महेश भराडीया, उपाध्यक्ष अक्षय जालिंदर कदम, डॉ. जगदिश भराडिया, मंगलताई जा. कदम, जागृतीताई भराडिया, मनालीताई भराडिया, सोसायटी चेअरमन पांडुरंग कदम, डोंगरगणच्या सरपंच वैशालीताई मते,मांजरसुंबा सरपंच रुपालीताई कदम, पिंपळगाव माळवी सरपंच राधीका प्रभुणे, उपसरपंच मच्छिंद्र झिने, तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम, पुणे येथील लेट अमिनखान मास्टर एज्युकेशन फाऊंडेशनचे सचिव बरकत खान, प्राथ. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष तथा डोंगरगण उपसरपंच संतोष पटारे, अध्यक्ष, माध्य. शाळा व्यवस्थापन अध्यक्ष देविदास ना. कदम, संजय मते, प्राचार्य संभाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थिती तसेच सर्व सेवक वृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी न्यू इंग्लिश स्कूल, डोंगरगण यांच्या उपस्थितीत न्यू इंग्लिश स्कूल, डोंगरगण, ता.जि. अहिल्यानगर येथे होणार आहे. सर्वांनी कार्सक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.