जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन
अहमदनगर | ८ जानेवारी | पंकज गुंदेचा
(latest news) महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांची निवड करण्यात आली. तसे पत्र विभागीय समादेशक सिकंदर शेख यांनी दिले. निवडीप्रसंगी जिल्हा समादेशक सोमनाथ बोंतले, राज्याध्यक्ष संजय शेंडे, उपाध्यक्ष पितांबर महाजन, राज्य महासमादेशक अनिल शेजाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
(latest news) ही संघटना पोलीस विभागास सहकार्य करण्याचे काम करते. त्याचप्रमाणे शालेयस्तरावर विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा तसेच परिवहन नियमांचे मार्गदर्शन करते. निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्हा वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण विभागाच्या सर्व सदस्यांच्या वतीने तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर