निवृत्ती महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान; अल्पोपहार करून घेतला मार्केटयार्डचा निरोप

अहमदनगर | पंकज गुंदेचा

काल रात्री मार्केटयार्ड येथे मुक्कामी असलेली नाशिक येथील निवृत्ती महाराज दिंडी सोहळा अल्पोपहार करून पंढरपूरकडे रवाना झाला. आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून पंढरपूरकडे दिंड्या रवाना होत असतात. त्यांना रस्त्यावरील विविध गावांमधे चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था केलेली असते. याचकाळात अहमदनगरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या शहरातील मार्केटयार्ड मध्ये मुक्कामी असतात. त्यांना येथील फळे व भाजीपाला आडते व्यापारी, हमाल मापाडी बांधव यांच्यावतीने सेवा केली जाते. भोजन व्यवस्था केली जाते.
काल सकाळी निवृत्ती महाराज दिंडीचे अल्पोपहार करून सोलापूररोडने पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
अल्पोपहाराची व्यवस्था गणेश राऊत, बाबा राऊत, अंबादास गिते, विनोद कानडे, दिनेश जायभाय, सिध्देश फुलसौंदर, ओम फुलसौंदर, रविंद्र फुलसौंदर, सचिव हिरवे, बाबू कचरे, गणेश पितळे, आदींनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *