अहमदनगर | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा रथामागे दिंडी नंबर २७ मधील दिंडीप्रमुख तथा नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ किर्तनकर ह.भ.प. रामनाथ महाराज कहांडळ शिलापूरकर यांचे आज ता. ३ जुलै रोजी पहाटे ४:१५ वाजता अहमदनगर येथे पंढरपूर वारी पालखी सोहळ्यातच तीव्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे वय ८२ वर्षे होते.
पहाटे अस्वस्थ वाटून खूप घाम येत असल्याने सहकारी वारकरी यांनी तात्काळ शेजारच्या मार्केटयार्ड परिसरातील हॉस्पिटलमधे नेत असताना त्यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी मुळगावी नाशिकमधील शिलापूर येथे दुपारी साश्रूनयनांनी परिसरातील शेकडो भाविकभक्त व वारकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे नाशिक येथून २० जून रोजी प्रस्थान झाले होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.