शेवगाव | प्रतिनिधी |२३.६.२०२४
शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देणे हि सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी विद्यार्थी युवकांनी चांगले शिक्षण व रोजगार हक्कासाठी सतत संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राष्ट्रीय महासचिव कॉ. ॲड. अभय टाकसाळ यांनी केले. शेवगाव येथे आयोजित ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हा शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
एक दिवसाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे जिल्हा सेक्रेटरी कॉ. ॲड. बन्सी सातपुते, प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक ऑल इंडिया युथ फेडरेशनचे राज्य निमंत्रक कॉ. संजय नांगरे यांनी केले.
ॲड. टाकसाळ पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितानाच चौदा वर्षांपर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे केले पाहिजे, म्हणून तरतूद केली आहे. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. आता केजी टू पीजी शिक्षण मोफत केले तरच सर्वांना समान संधी मिळेल. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी. व्यवसाय देवून बेरोजगारी कमी करण्यासाठी धोरणे आखली पाहिजेत. जगामध्ये भारत तरूणांचा देश आहे. तरुणांना बेकारीच्या खाईत लोटणे म्हणजे जातिय, धार्मिक उन्मादाला व अराजतेला खतपाणी घालणारे ठरेल, याची सरकारणे नोंद घ्यावी असे ते म्हणाले.
शिबिरात प्रज्ञा उगले, अभी बोरुडे, अक्षय साखरे, यश बोरुडे, अजिंक्य लहासे, सूरज नागरे, राजेंद्र वाघमारे, रुद्र पवार, विश्वकर्मा अमरनाथ, बुचडे सार्थक, अमोल तुजारे, आदित्य लांडे, अफरोज शेख, ज्ञानेश्वर राशिनकर, सायली राहुल वरे, राज राहुल वरे, ओम साखरे, आदित्य भुजबळ आदिंसह विद्यार्थी युवकांनी सहभाग घेतला. ऑल इंडिया युथ फेडरेशनचे संदिप इथापे यांनी आभार मानले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.