२५ जूनपुर्वी शेतकऱ्यांनी वेळेत फळपिकांचा विमा भरून घ्यावा; कृषि विभागाचे आवाहन

eBrochureMaker 13062024 095235png

मुंबई (प्रतिनिधी) १३.६.२४
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षात राबवण्यासंदर्भात राज्य शासनाने मान्यता दिली. मृग बहार व आंबिया बहारातील ठराविक फळ पिकांचा विमा शेतकरी बांधवांनी भरून या योजनेत सहभागी व्हावे.
या हंगामात राज्यात डाळिंब, संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष, आंबा, पपई, काजू, स्ट्रॉबेरी व द्राक्ष (क) इत्यादी पिकांचा फळपीक विमा योजनेत सहभाग करण्यात आला आहे.
मृग बहरात द्राक्ष (क), संत्रा, पेरू, लिंबू या चार पिकांसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत २५ जून निश्चित करण्यात आली आहे; त्याचबरोबर मोसंबी चिकू ३० जून, डाळिंब १४ जुलै तर सीताफळ पिकासाठी ३१ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. तरी शेतकरी बांधवांना आवाहन आहे की वेळेत आपल्या फळ पिकांचा विमा भरून घ्यावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *