अहमदनगर | प्रतिनिधी |२६.६.२०२४
केडगाव येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे महाराणी ताराबाई कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व राजर्षी शाहू बालक मंदिरच्या वतीने शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे समवेत स्नेहालयाचे संचालक सदस्य संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष गवळी, प्रा. पी. एम. साठे, महेश गुंड, डॉ. बागले, खाकाळ, बबनराव कोतकर, प्राचार्या व्ही. डी. धुमाळ, जे. एस. सातपुते याच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे (मंत्री) म्हणाले की, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव येथे शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज यांनी सक्तीचे व मोफत शिक्षणाचा कायदा केला व विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची सोय केली स्त्रियांसाठी अत्याचार विरोधी घटस्फोट इत्यादी कायदे केले तसेच बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. राजश्री शाहू महाराज हे पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारायचे होते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला शिक्षणाची व नोकरीची संधी सर्वसामान्यांना निर्माण करून दिली त्याचे विचार व कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कोतकर यांनी केले. आभार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हस्के यांनी मानले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.