अहमदनगर (दत्ता वडवणीकर) ११.६.२४
नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष व रा. स्व. संघ भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्राचार्य सुनील पंडित यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यांनी भाजपाची उमेदवारी मागितली असून त्यांना उद्या ता. १२ जून दुपारपर्यंत भाजपा प्रदेश कार्यालयातून उमेदवारी जाहीर केली जाईल, असे समजते.
प्राचार्य सुनील पंडित यांनी नाशिक विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे उमेदवारीला अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघांमध्ये शिक्षकांचा मोठा सहभाग असतानाही संस्थाचालक तसेच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच तांत्रिक व त्याचप्रमाणे तंत्रनिकेतन तसेच आयटीआय, विनाअनुदान संस्थांमधील तसेच कायम विनाअनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी आपले जिव्हाळ्याचे प्रश्न मांडण्यासाठी शिक्षणक्षेत्रातील शिक्षकच उमेदवार दिला पाहिजे. तो शिक्षक संघटनेसोबत सहमत व बांधील असला पाहिजे, ध्येयशील कार्यशील कार्यकर्ता असला पाहिजे, असे पंडित म्हणाले.
यावेळी नाशिक विभागाचे शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शरद दळवी, शिक्षक परिषदेचे प्रांत कार्याध्यक्ष प्राचार्य दिलीप अहिरे, संस्थाचालक संघटनेचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रमुख डॉ. दत्ता निक्रड, शिक्षक सेल प्रा. सखाराम गारुडकर, प्रसाद सामलेटी, जुन्या पेन्शन योजनेचे संघटक नितीन केणे, सुमन हिरे आदी उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.