श्रीरामपूर (प्रतिनिधी) १२.६.२४
येथील पत्रकार व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (wcpa)अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल वर्ल्ड पार्लमेंटचा सर्वोच्च पुरस्कार ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४’ देऊन सन्मानित करण्यात आले.
श्रीरामपूर येथील समारंभात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे, डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, हमाल साहित्यिक आनंदा साळवे, एसटी महामंडळाचे नवनाथ गवळी, संपादक स्वामीराज कुलथे, पत्रकार सुनिल पाटील, जेष्ठ कवी रज्जाक शेख, राष्ट्रपतीपदक विजेत्या मोनिका शिंपी, जेष्ठ कवयित्री मंजुषा ढोकचौळे, डॉ.शैलेंद्र भणगे, सी.के भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
महेश कांबळे हे गेली २५ वर्षे पत्रकारिता करत असून त्याना दा. प. आपटे पत्रकारिता पुरस्कार, पुणे महानगरपालिका, दै. सामना, दै. लोकसत्ता, संकेत अकॅडमी यांचे पुरस्कार मिळालेले आहेत तसेच ते मनपाचे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य असून जागतिक साळी फाऊंडेशन व बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. प्रतिबिंब संस्थेचे सचिव असून लक्ष्मीनारायण शाळेचे माजी सचिव आहेत त्यांनी काढलेले प्रेस फोटो व लेख मराठी, हिंदी, इंग्रजी दैनिकात प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी आचार्य आनंदऋषी महानिर्वाणचे फोटो प्रदर्शन व फोटो क्लबच्या वतीने नगरमध्ये फोटो प्रदर्शन भरवलेले होते. अवतार मेहेरबाबा व कोरठण खंडोबा या दोन माहितीपटांची त्यांनी निर्मिती केलेली आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.