श्रीरामपूर (प्रतिनिधी) १३.६.२४
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (wcpa) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाच्या वतीने मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी एक आगळावेगळा साहित्यिक उपक्रम राबविला. वसुधैव कुटुंबकम् अर्थात अवघे विश्वची माझे घर या व्रतानुसार सर्व प्रकारच्या गुणवंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या संकल्पनेतून अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून मानवाच्या जीवनातला अविभाज्य घटक असलेल्या वडिल (बाप) या आगळ्यावेगळ्या विषयावर काव्यसंमेलन श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात करण्यात आले.
राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवी कवयित्रींनी आपले स्वरचित काव्य सादर केले. यामध्ये नवोदित, प्रस्थापित व होतकरू या सर्वांचा समावेश होता. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री मंजुषा ढोकचाळे तर सुत्रसंचालन प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे यांनी केले.
डॉ. वृंदा पुरोहित (कल्याण), कौसर पिंजारी (आश्वी), अजय नान्नोर (श्रीरामपूर), अशोक बोबडे (राहुरी), प्रमोद येवले (कोपरगांव), प्रा. रामचंद्र राऊत (श्रीरामपूर), हरिदास विठ्ठल काळे (श्रीरामपूर), सिंधु विश्वरत्न साळेकर (पुणे), कविता बाळू आडांगळे (नेवासा), प्रकाश खैरनार (कल्याण), सायली करपे (बेलापूर), वैशाली कुलकर्णी (बेलापूर), मोनिका शिंपी (धुळे), संगीताताई जामगे (गंगाखेड), रज्जाक शेख, आनंदा साळवे (श्रीरामपूर ), संजय वाघमारे, (नेवासा). या कवींनी आपल्या रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा. नरसिंहा मूर्ती यांनी उपस्थितांना ऑनलाईन संबोधित केले. ज्येष्ठ कवी तथा सेवानिवृत्त न्यायाधीश विलास घोडचर यांच्या काव्य हृदयातले व मनातल्या चारोळी या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जेष्ठ कवयित्री संगीता जामगे यांच्या ‘तू विश्वाची नारी शक्ती’ व ‘साथ सूर संगीताची’ या पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले.
सर्व सहभागी कवींना वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.