राज्य शिष्यवृत्ती परिक्षेत कृष्णा चन्ना राज्यात चौथा तर जिल्ह्यात प्रथम - Rayat Samachar

राज्य शिष्यवृत्ती परिक्षेत कृष्णा चन्ना राज्यात चौथा तर जिल्ह्यात प्रथम

rayatsamachar
1 Min Read

अहमदनगर | प्रतिनिधी

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या इ.५ वी पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्येऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूलचा कृष्णा रविंद्र चन्ना याने २९४ पैकी २८० गुण मिळवत राज्यात चौथा तर जिल्ह्यात शहरी विभागात पहिला येण्याचा मान पटकाविला.

परिक्षेस राज्यातून सुमारे १ लाख २२ हजार ६३६ विद्यार्थी पात्र होते. पैकी १६,६९१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. चि. कृष्णा चन्ना यास प्रिन्सीपल निलिमा रॉड्रीक्स, जयश्री कासवा, आई सुरेखा, वडिल रविंद्र चन्ना, बहिण कु.सई चन्ना यांचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisement -

कृष्णा चन्ना यांने यापुर्वी गणित प्रज्ञा परिक्षेत जिल्ह्यात प्रथम, हेडगेवार प्रज्ञाशोध परिक्षेत जिल्ह्यात प्रथम, तर दरवर्षी ऑलिंपियाड स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळवत आहे. या यशाबद्दल ऑक्झिलिअम कॉन्व्हेंट पालक संघटनेसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading