जामखेड | रिजवन शेख, जवळा
पंढरपूरचा पांडुरंग महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाकरीता सर्व जातीधर्माचे लोक दिंडीत सहभागी होत पायी चालत निघतात. गावागावातून पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लोकं जातीपाती सोडून एकत्र येतात. याचेच एक प्रतीक म्हणजे जामखेड तालुक्यातील जवळा गावातील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा राखत दिंडीतील वारकऱ्यांची सेवा घडावी या हेतूने दिंडीसाठी येथील मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये चहा आणि नाष्ट्याची सोय करत उत्साहात त्यांचे स्वागत केले.
पुणे जिल्ह्यातील सरदवाडी येथील श्रीक्षेत्र श्रीराम देवस्थान ट्रस्टचा दिंडी सोहळ सरदवाडी ते पंढरपूर जात असतो. जामखेड, नान्नज, बोर्लेमार्गे जवळा असा दिंडीमार्ग असतो. ह.भ.प. तेजेराव महाराज कात्रजकार व ह.भ.प. बाळासाहेब महाराज गाडे यांच्या प्रेरणेतून ही दिंडी मार्गस्थ होत असते.
यावर्षी प्रमाणे येणाऱ्या प्रत्येक वर्षी मुस्लिमांकडून सेवा केली जाईल आणि ती स्वीकारावी अशी विनंती देखील केली. केलेल्या सेवेबद्दल दिंडीतील सर्व वारकरी मंडळींनी तसेच दिंडीचालक व महाराज यांनी आभार मानले. याच पद्धतीने प्रत्येक वर्षी आम्ही मुस्लिम बांधवांच्या सेवा स्वीकारू असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई सय्यद, मोहम्मदभाई शेख, खलीलभाई शेख, शद्रोद्दीनभाई शेख, अहमदभाई शेख, दिलावरभाई शेख, आलमभाई पठाण, आसिफ सय्यद, आसिफ शेख, तय्याब शेख, इंनुस भाईशेख, इकरमोद्दीन मुलानी, प्रदीप म्हसवडकर, रामभाऊ म्हसवडकर, पत्रकार संतराम सूळ, संदीप काढणे, मजहर शेख, लकमान सय्यद आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.