अहमदनगर | प्रतिनिधी
पुणे येथील जगप्रसिद्ध टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पत्रकारिता पदवी व पदव्युत्तर पदवी म्हणजे मुद्रित आणि छपाई माध्यमे परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर केंद्राचा निकाल हा शंभर टक्के लागला.
अहमदनगर केंद्रावर पत्रकारिता पदवी (Batchaler of Journalism) परीक्षेत सावेडी येथील राजर्षी शाहूनगरमधील रहिवासी रा.स्व.संघाचे कार्यकर्ते कुलदीप कुलकर्णी यांच्यासह आकाश आगरकर, आदिनाश शिंदे यांनी यश मिळवले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अहमदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब धस, वामन व इतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.