
नगर तालुका (प्रतिनिधी) ११.६.२४
अहमदनगर शहराचा बाह्यवळण रस्ता सुरु करण्यात आला. रस्त्याच्या कामाचे आरणगावजवळ रेल्वे उड्डाणपूल काम अपूर्ण असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. चौपदरी असणारा रस्ता दुहेरी आहे. अशा स्वरूपाचे दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक होते. ते नसल्यानेच आज पुन्हा येथे गंभार अपघात झाला. ता. ६ रोजी याच ठिकाणी राहुरीच्या दोन बुलेटस्वारांचा अपघात होऊन ते मृत्युमुखी पडले. तीस मीटर लांब गाड्या वळण घेताना उजव्या बाजूला घेऊन वळवाव्या लागतात त्यामुळे आजचा अपघात झाला.
अपघात झाल्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य संदेश कार्ले यांनी आक्रमक भूमिका घेत गावकऱ्यांसह रस्ता अडवला. जोपर्यंत संबंधित अधिकारी, कंपनीचे अधिकारी दिशादर्शक फलक तसेच सर्व्हिस रोड, उड्डाणपुलावरील दौंडरोडला उतरणारा रस्ता करत नाहीत, तोपर्यंत रस्ता सुरु होऊ देणार नाही. अशी भूमिका घेतली. कंपनीने व दुसरे अधिकारी पाटणकर यांनी त्वरित घटनस्थळी येऊन रस्ता दुभाजक तोडून संदेश कार्ले व ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तातडीने काम करून दिले तसेच तात्काळ दिशादर्शक फलक लावण्याचे मान्य केले त्यामुळे लगेच रस्ता मोकळा करण्यात आला.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.