अहमदनगर | प्रतिनिधी | २४.६.२२०४
भाजपा शहर जिल्हा व्यापारी आघाडीच्या वतीने पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय जगन्नाथ आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, चिटणीस गोपाल वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षनाथ गड, मांजरसुंभा येथे काल ता. २३ रोजाी ट्रेकिंग व वृक्षारोपण करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या प्रेरणेने ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेला अनुसरून १०८ झाडांचे रोपण करण्याचा व्यापारी आघाडीचा मानस आहे. त्याचा प्रारंभ काल करण्यात आला.
व्यापारी आघाडीच्या वतीने २१ झाडांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचे संयोजक नीरज राठोड, सदाशिव सोनवणे, प्रवीण आंधळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे, सरचिटणीस हर्षल बोरा, उपाध्यक्ष नीरज राठोड, गोपाळ वर्मा, रुपेश वर्मा, व्यापारी आघाडी मध्य मंडल अध्यक्ष प्रशांत बुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.