अकोले (प्रतिनिधी) १९.६.२०२४
अकोले येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकारणी, पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा पक्षाचे प्रांताध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता – भगिनींच्या विकासाबाबत अनेक ठोस पावले सरकारच्या माध्यमातून उचलली गेली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांना अधिकाधिक निधी व न्याय देण्याची भूमिका घेत सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे, असे तटकरे यावेळी म्हणाले
विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत ताकदीने कामाला लागला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच तळागाळातील नागरिकांशी जनसंपर्क वाढवावा, असे आवाहन रूपाली चाकणकर यांनी यावेळी केले.
यावेळी डॉ. किरण लहामटे, अविनाश आदिक, सिताराम पाटील गायकर, सुरज चव्हाण, सुनील मगरे, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहटा, कपिल पवार, अनुराधा नागवडे, कृष्णा आढाव, शरद चौधरी, मनोज मोरे, अक्षय अभय, अशोक देशमुख, पुष्पाताई लहामटे, भानुदास तिकांडे, परबतराव नाईकवडी, लहामटे गुरुजी आदी मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.